ठाणे, २४ सप्टेंबर, २०२५ (TGN/ बबिता स्वामी 8355975478): जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर जबाबदाऱ्या बदलत जातात. युवावस्थेमध्ये कुटुंबाची सुरक्षा सर्वात मोठे प्राधान्य असते, जसे की, कर्जाची परतफेड, मुलांची शिक्षणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे. या वयामध्ये प्रियजनांना अनिश्चिततेपासून वाचवण्यासाठी एक चांगला जीवन विमा अत्यावश्यक आहे.
सेवानिवृत्ती जसजशी जवळ येत जाते, गरजा बदलत जातात. मुले स्वतंत्र होतात, कर्ज चुकवली गेलेली असतात आणि एक आरामदायी, चिंतामुक्त सेवानिवृत्ती जीवनासाठी स्थिर उत्पन्न निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. हा बदल एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो, वर्तमानाची सुरक्षा आणि भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्य या दोघांमध्ये समतोल कसा राखावा?
हा प्रश्न सोडवण्यासाठी, भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने (टाटा एआयए) लॉन्च केली आहे टाटा एआयए शुभ महा लाईफ योजना. ही एक नॉन-लिंक्ड पार्टीसिपेटिंग होल लाईफ सेविंग्स प्लॅन आहे जो आयुष्यातील विविध टप्प्यांवर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
संपूर्ण आयुष्यभरासाठी अनुकूल योजना
शुभ महा लाईफ गुंतवणूकदारांना आपल्या कुटुंबांची सुरक्षा करण्याबरोबरीनेच भविष्यासाठी शाश्वत आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याचा अधिकार देते. या योजनेमध्ये मिळते
सर्वात जास्त कमाईच्या वर्षांमध्ये जास्तीत जास्त जीवन विमा – जेव्हा जबाबदाऱ्या कमी असतात.
सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये कमी विमा – कारण आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणे कमी होत जाते.
इक्विटी गुंतवणुकीमार्फत विकासाच्या संभावनेसह कर-मुक्त सेवानिवृत्ती उत्पन्न.
दीर्घकालीन गंभीर आजार सुरक्षा – नंतरच्या वर्षांमध्ये आरोग्य आवश्यकतांनुसार सुरक्षा.
महा लाईफच्या वारशावर उभी नवी योजना
शुभ महा लाईफ, टाटा एआयएची लोकप्रिय महा लाईफ योजनेच्या वारशावर आधारित आहे. एका समकालीन अवतारामध्ये पुन्हा तयार केली गेलेली, शुभ महा लाईफ योजना आजच्या गुंतवणूकदारांच्या आवश्यकतांनुसार अनुरूप, अधिक चांगले लाभ आणि सर्वसमावेशक सुरक्षा प्रदान करते.
ज्याप्रमाणे एक स्मार्टफोन अनेक उपकरणांची जागा घेऊन आयुष्य सहजसोपे बनवतो, त्याचप्रमाणे शुभ महा लाईफ ही एकच योजना विविध उद्दिष्ट्ये पूर्ण करून आर्थिक नियोजन सुव्यवस्थित करते जसे की, सेवानिवृत्तीपर्यंत सुरक्षा, नंतरच्या वर्षांमध्ये उत्पन्न आणि वारसा निर्माण करणे इत्यादी.
टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे मॅनेजिंग पार्टनर बिझनेस असोसिएट, श्री सिद्धार्थ श्याम छाब्रिया यांनी सांगितले, “टाटा एआयएमध्ये आम्ही असे मानतो की, आयुष्य सतत बदलत असते आणि आर्थिक गरजा देखील बदलत राहतात. आम्हाला अभिमान वाटतो की शुभ महा लाईफसोबत आम्ही एक अशी योजना देत आहोत जी जीवनातील विविध टप्प्यांसाठी अनुकूल आहे – जीवनातील सर्वात महत्त्वाच्या वर्षांमध्ये मजबूत सुरक्षा आणि सेवानिवृत्तीमध्ये पुरेसे, करमुक्त उत्पन्न, त्यासोबत दीर्घकालीन गंभीर आजारांसाठी कव्हर देखील दिले जाते. ही योजना पारंपरिक विम्याच्या पलीकडे जाऊन संरक्षण प्रदान करण्याची आमची वचनबद्धता रेखांकित करते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या जीवन वाटचालीमध्ये शाश्वत सुरक्षा, विकास आणि मनःशांती मिळवण्यात मदत होते.”
शुभ महा लाईफची प्रमुख वैशिष्ट्ये
सर्वसमावेशक सुरक्षा: कव्हर पर्यायांसह लवचिक पार्टीसिपेटिंग प्लॅन
विकास क्षमता: इक्विटी भागीदारीच्या माध्यमातून संतुलित परतावा
करमुक्त सेवानिवृत्ती उत्पन्न: आर्थिक स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्यभरासाठी खात्रीशीर उत्पन्न
आयुष्यभराचा पर्याय: नंतरच्या वर्षांमध्ये देखील उत्पन्न आणि सुरक्षा वाढवू शकता.
सर्वसमावेशक लाभ: महिला (२%), टाटा एआयएच्या वर्तमान ग्राहकांची कुटुंबे आणि नॉमिनेटेड व्यक्ती (४%) आणि टाटा समूहातील कर्मचारी (२०%) यांच्यासाठी पहिल्या वर्षातील प्रीमियमवर विशेष सूट
चार खास तयार केलेली पॅकेजेस
विविध आवश्यकता पूर्ण करण्यासाठी शुभ महा लाईफ चार पॅकेज पर्यायांसह उपलब्ध आहे:
शुभ महा लाईफ गोल्ड – दुर्घटना मृत्यू लाभ (ADB) आणि दुर्घटनेमध्ये संपूर्ण व कायमचे अपंगत्व (ATPD) यासारख्या रायडर्ससह उच्च कव्हर
शुभ महा लाईफ प्लस – वार्षिक प्रीमियमच्या जवळपास ३० पट कव्हर, उच्च उत्पन्न, एकरकमी पर्याय आणि सर्वसमावेशक सुरक्षा
शुभ महा लाईफ गोल्ड हेल्थ – उच्च कव्हर आणि ३० वर्षांपर्यंत दीर्घकालीन गंभीर आजार सुरक्षा
शुभ महा लाईफ प्लस हेल्थ – ३० पट कव्हर, गंभीर आजारामध्ये सुरक्षा आणि सर्वसमावेशक सुरक्षेसाठी ATPD आणि टर्मिनल आजारामध्ये सुरक्षा यासारखे रायडर्स
जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी लवचिक पेमेंट पर्याय
पॉलिसीधारक तीन पेआउट स्ट्रक्चर्सच्या माध्यमातून स्वतःला अनुकूल लाभ मिळवू शकतात:
सेवानिवृत्ती उत्पन्न पर्याय: सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी स्थिर, करमुक्त उत्पन्न आयुष्यभरासाठी.
डिफर्ड उत्पन्न पर्याय: शिक्षण, लग्न किंवा व्यावसायिक गरजा यासारख्या महत्त्वपूर्ण टप्प्यांसाठी ठरवून ठेवलेले सेकंडरी उत्पन्न
एकरकमी पर्याय: सेवानिवृत्ती, वारसा नियोजन किंवा दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी धन जमा करण्यासाठी मॅच्युरिटीनंतर एकरकमी पेआऊट
निव्वळ सुरक्षा नाही तर त्याही पलीकडे जाऊन परिपूर्ण कल्याण
शुभ महा लाईफ फक्त आर्थिक सुरक्षा देत नाही तर टाटा एआयए हेल्थ बडीला जोडून घेऊन प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, टेलीकन्सल्टेशन, आजाराचे निदान, फिजिओथेरपी, जीवनशैली व्यवस्थापन आणि महिलांसाठी विशेष आरोग्य कार्यक्रम या सुविधा देखील यामध्ये मिळतात. ही फक्त एक योजना नाही तर आर्थिक आणि शारीरिक कल्याण साध्य करण्याच्या वाटचालीतील सहयोगी आहे.
आयकर लाभ हे त्या-त्या वेळच्या आयकर अधिनियमानुसार लागू होतील.
#निवडक शुभ महा लाईफ व्हेरियंट्सवर लागू.