मुंबई, 4 मे 2024 (TGN): सुधाकर घारेंनी महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम करायचा आपला शब्द पाळत शुक्रवारी कर्जत खालापूर मतदारसंघात मावळचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणेंसाठी सर्वात मोठ्या सभेचे आयोजन करत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रम पार पाडला. शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत शहरातील रॉयल गार्डन येथे हा कार्यक्रम संप्पन्न झाला. कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनिल अण्णा शेळके उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संखेने हजेरी लावली होती.
उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा पाढा वाचला तसेच समोरच्या उमेदवाराकडे सांगण्यासारखे काही काम नाही असे सुतोवाच केले. यावेळी दत्तात्रय मसुरकर, हनुमंत पिंगळे, अशोक भोपतराव, भरतभाई भगत, एकनाथ धुळे, अंकित साखरे, हरेष गुढे, अमिर मनियार, सोमनाथ पालकर, भानुदास पालकर, अॅड राजेंद्र निगुडकर, ज्ञानेश्वर गायकवाड, साजीद मालदार, सरफराज टिवाले, दिपक श्रिखंडे, भगवान भोईर, राजाभाऊ कोठारी, वैशाली जाधव, मधुरा चंदन, मनिषा ठोंबरे, उमाताई मुंढे, एच. आर. पाटील, भगवान चंचे, भगवान भोईर, संतोष बैलमारे, संतोष गुरव, मनिष यादव, प्राची पाटील, रंजनाताई धुळे, स्वप्निल पालकर यांच्यासहीत दोन्ही तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडक उन्हातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मेळाव्याला गर्दी
यावर्षीची लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाचा सर्व मतदारांना एकंदरीत कडक उन्हाळ्यामुळे त्रास होत आहे. त्यामध्ये लग्नांचे मुहुर्त यामुळेच मतदानाचा टक्का यावेळी घसरल्याचे जाणकार सांगत आहेत. याचाच फटका राजकिय सभा आणि मेळाव्यांना होताना दिसत आहे. दरम्यान कर्जत खालापूर मध्ये शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या महायुतीच्या संवाद मेळाव्यावर याच उन्हाचे सावट असुन सुद्धा रॉयल गार्डनचे सभागृह खचाखच भरलेल पहायला मिळाले. कर्जत शहरात एवढ्या कडक उन्हातही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जबाबदारीने संवाद मेळाव्यासाठी उपस्थित राहीले. सभागृह पुर्ण क्षमतेने भरल्याने अनेकजन सभागृहाबाहेर लावलेल्या मंडपात थांबून मान्यवरांचे भाषण ऐकत होते.
सुधाकर घारेंचा कार्यक्रम म्हणजे उत्कृष्ट नियोजन
कार्यक्रम कोणताही असला, तो छोटा किंवा मोठा माननीय सुधाकर भाऊ घारेंचे कार्यक्रमाचे नियोजन मात्र एक नंबर असते अशा प्रतिक्रीया यावेळी उपस्थितांनी दिल्या. एवढ्या उन्हात बसण्याची व्यवस्था असो किंवा मग पाण्याची आणि जेवणाची सोय सर्वांसाठी योग्य पद्धतीने करण्यात आली होती. एक चांगला नेता कधीही आपल्या कार्यकर्त्याला उपाशी राहु देत नाही अशा भावना लोकांनी बोलुन दाखवल्या. नेहमीप्रमाणे या मेळाव्यासही महीलांची गर्दी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात होती. सुधाकर घारेंच्या नेतृत्वात पक्षात महिला संघटन मोठ्या ताकदीने सक्रिय असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम त्यांच्या प्रत्येक सभेला पहायला मिळतो. अनेक विरोधक त्यांच्या हळदीकुंकुच्या कार्यक्रमाला नावे ठेवतात. परंतु या माध्यमातून ते खुप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्षाशी महिलांना जोडण्यात यशस्वी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एकंदरीत विविध समाजघटकांना योग्य नियोजन आणि विनम्र संवादातून सुधा भाऊंचे नेतृत्व आकर्षित करत असल्याचे पहायला मिळत आहे.
सुनिल अण्णा शेळकेंनी साधला रोहीत पवारांवर निशाना
दरम्यान संवाद मेळाव्यात बोलताना मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी रोहीत पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले की, “माननीय अजित दादा पवार यांनी रोहीत पवारांना बारामतीतुन जिल्हापरिषदेवर निवडून आणले. त्यानंतर कर्जत जामखेड मधून टिकिट दिल सोबतच एका मतदारसंघापुरत्या मर्यादित असणाऱ्या आमदाराला हजारो कोटिंचा निधी मिळवून दिला. आता तोच माणूस आदरणीय दादांवर टिका करत आहे.” यावेळी सुधाकर घारेंवरील आपले असणारे प्रेम दाखवायला सुनिल अण्णा विसरले नाहीत. ते म्हणाले की, “सुधा भाऊ यावेळी २०२४ ला आपल्याला सोबत विधानसभेत जायचय” यानंतर सभागृहात टाळ्यांचा जोरदार गडगडाट झाला.
एकंदरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मेळावा महायुतीमधील सर्वात मोठा मेळावा ठरला. यामुळे सुधाकर भाऊ घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपण तालुक्यात एक नंबरचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.