झुनो जनरल इन्श्युरन्सतर्फे पे हाऊ यू ड्राइव्ह (पीएचवायडी) ही अभिनव योजना सादर, मोबाइल टेलिमॅटिक्सवर आधारित भारतातील पहिली ‘ॲड-ऑन’
मुंबई, 6 ऑगस्ट, 2024 (GPN): झुनो जनरल इन्शुरन्स या नव्या युगातील एका डिजिटल विमा कंपनीने आज आपल्या नवीन “पे हाऊ यू ड्राईव्ह (पीएचवायडी)” या अॅड-ऑनचा शुभारंभ केला आहे. हा नावीन्यपूर्ण कव्हरेज (विमा संरक्षण) पर्याय खासगी कार पॅकेज आणि खासगी कार स्टँड अलोन ओन डॅमेज पॉलिसी (एसएओडी) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणणारा हा कव्हरेज पर्याय वापरकर्त्यांना त्यांच्या ड्रायव्हिंग कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी, झुनो ड्रायव्हिंग क्वोशंट हा ऑब्जेक्टिव्ह प्राप्त करण्यासाठी आणि सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी सक्षम करतो.
पीएचवायडी झुनो अॅपमध्ये एम्बेड केलेल्या मोबाइल टेलीमॅटिक्सद्वारे ड्रायव्हिंगच्या पद्धतीचे वर्तनाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करते. ग्राहक प्रत्येक प्रवासानंतर त्यांच्या ड्रायव्हिंग स्कोअर्सचे निरीक्षण करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि सुरक्षित ड्रायव्हिंगच्या सवयींसंदर्भात केलेल्या प्रगतीबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. प्रवासानंतर स्कोअर उपलब्ध होत असून, ग्राहकांना विविध स्कोअर रेंजसाठी लागू असलेल्या सवलतींची देखील माहिती मिळते. नूतनीकरणाच्या वेळी, एकूण प्रीमियमच्या रकमेवर लागू असलेली सवलतीची टक्केवारी देखील समजते. त्यामुळे या प्रक्रियेबद्दल ग्राहकांशी पारदर्शकपणे व स्पष्टतेने व्यवहार केला जातो. झुनो ही भारतातील पहिली कंपनी आहे जी वापरावर आधारित विमा, या प्रक्रियेचा अवलंब करत आहे आणि नेहमीच वापरावर आधारित विम्यासंदर्भातील नवनवीन उत्पादने विकसित करत आहे. ‘स्विच’ या त्यांच्या पहिल्या यूबीआयचे (युझर बेस्ड इन्श्युरन्स) विस्तारीकरण म्हणजे ही योजना आहे. पहिल्यांदाच एखाद्या कंपनीने ‘ड्रायव्हिंग वर्तना’चा उपयोग कार विमा प्रीमियम वैयक्तिकरण करण्यासाठी केला आहे.
पीएचवायडी अॅड-ऑन विमा नूतनीकरण प्रीमियमवर लक्षणीय सवलत देऊन सुरक्षित ड्रायव्हिंगला चालना देत आहेच, त्याचप्रमाणे नूतनीकरणाच्या वेळी देण्यात येणाऱ्या सवलतींच्या माध्यमातून चांगले ड्रायव्हिंग सक्रियपणे करण्यास प्रोत्साहन देते.
या उद्योगातील क्रांतिकारी लॉन्चबद्दल झुनो जनरल इन्शुरन्सच्या एमडी आणि सीईओ, शनाई घोष म्हणाल्या, “आम्ही आमचे नवीन ‘पे हाऊ यू ड्राईव्ह (पीएचवायडी) अॅड-ऑन’ सादर करताना खूप उत्साहात आहोत. पीएचवायडीसह, आम्ही विमा एका नव्या प्रकारात सादर करत आहोतच, त्याचप्रमाणे सुरक्षित ड्रायव्हिंग केल्याबद्दल इन्सेन्टिव्ह्ज (लाभ) देऊ करत सुरक्षित ड्रायव्हिंग पद्धतींना चालना देत आहोत. आमच्यासाठी हा केवळ एक विमा नाही तर नवकल्पना, पारदर्शकता आणि सुरक्षित भविष्यासाठीची आमची ही प्रतिबद्धता आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या विम्याच्या रकमेवर, तसेच स्वतःच्या गरजेनुसार किंमतनिश्चिती करण्यावर नियंत्रण मिळणार आहे आणि सध्याच्या किंमतरचनेच्या दृष्टिकोनापासून दिलासा मिळणार आहे.
ग्राहकांना फायद्याबरोबरच, मध्यमांनाही नूतनीकरण कालावधीत सुधारित ग्राहक धारणा अपेक्षित आहे. हे अॅड-ऑन कंपनीच्या सर्व चॅनेल्सद्वारे उपलब्ध असेल, ज्यामध्ये मोटर डीलर्स, डिजिटल एजंट्स आणि पॉईंट ऑफ सेल इंटरमीडियरीज, डिजिटल मार्केटप्लेस आणि कंपनी वेबसाइटचा समावेश आहे.
लाँचच्या अगोदर, उत्पादनाविषयी असलेली उत्सुकता, या कॅटेगरीविषयी असलेली समज आणि भावना जाणून घेण्यासाठी, झुनो जनरल इन्शुरन्सने एका स्वतंत्र संशोधन एजन्सीद्वारे भारतातील चार महानगरांमध्ये सुमारे 600 प्रतिसादकांमध्ये एक संख्यात्मक सर्वेक्षण देखील केले आहे.
या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, सुमारे 90% लोकांनी यूबीआय ही संकल्पना आवडली आणि या संकल्पनेनुळे त्यांचे ड्रायव्हिंग सुधारण्यास मदत होईल, असे त्यांना वाटले. सुमारे 80% लोकांना ही योजना फायदेशीर आणि उपयुक्त वाटते आणि मार्केटमध्ये ही योजना उपलब्ध झाल्यास ती घेण्याचा ते निश्चितच विचार करतील. विशेषतः, यूबीआयबद्दल माहिती नसलेल्या लोकांपैकी सुमारे 60% लोकांनी यूबीआय खरेदी करण्याची इच्छा दर्शवली.
यूबीआयची दोन सर्वाधिक आवडलेली वैशिष्ट्ये म्हणजे ते चांगल्या ड्रायव्हिंग सवयी अंगी बाणविण्यास या योजनेमुळे प्रोत्साहन मिळते आणि सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी बक्षीस मिळते. त्याचप्रमाणे, 89% प्रतिसादक देखील असे मानतात की सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी बक्षीस दिल्याने ड्रायव्हिंग करण्याच्या पद्धतीत सकारात्मक परिणाम होईल.
या माहितीच्या अनुषंगाने, झुनो जनरल इन्शुरन्स ग्राहक आणि भागीदारांसाठी एक परिपूर्ण अनुभव प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. पीएचवायडीच्या माध्यमातून, झुनो जनरल इन्शुरन्स सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी बक्षिसे देण्यासह टिकाऊ भागीदारीला प्रोत्साहन देऊन नवकल्पना आणि ग्राहक समाधान यांसाठी आपले समर्पण पुन्हा एकदा स्पष्ट करते. अधिक माहितीसाठी, https://www.hizuno.com/ ला भेट द्या.