मुंबई,2 मे,2024 (TGN): स्पंदन स्फूर्ती फायनान्शियल लिमिटेड (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड/NSE: SPANDANA, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE: 542759) (“Spandana”) यांनी 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक तिमाहीसाठी आणि वर्षासाठी त्यांचे ऑडिट केलेले परिणाम आज जाहीर केले.
आर्थिक वर्ष ‘24 (FY24) चे प्रमुख ठळक मुद्दे:
- व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट/AMU): ₹11,973 कोटी; मागील आर्थिक वर्षासाठी (FY23) ही संख्या ₹8,511 कोटी होती.
अशा प्रकारे त्यात 41% वाढ दिसून येते.
- नवीन ग्राहक संपादन: 13.9 लाख, मागील आर्थिक वर्षासाठी (FY23) ही संख्या 8.8 लाख होती. अशा प्रकारे त्यात 59% वाढ दिसून येते.
- वितरण: ₹10,688 कोटी, मागील आर्थिक वर्षासाठी (FY23) ही संख्या ₹8,125 कोटी होती. अशा प्रकारे त्यात 32% वाढ दिसून येते.
- सकल नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स/GNPA) आणि निव्वळ नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (नेट नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स/NNPA): 1.50% आणि 0.30%
- उत्पन्न: ₹2,534 कोटी; मागील आर्थिक वर्षासाठी (FY23) ही संख्या ₹1,477 कोटी होती. अशा प्रकारे त्यात 72% वाढ दिसून येते.
- निव्वळ व्याज उत्पन्न: ₹1,289 कोटी, मागील आर्थिक वर्षासाठी (FY23) ही संख्या ₹810 कोटी होती. अशा प्रकारे त्यात 59% वाढ दिसून येते.
- करानंतरचा नफा (प्रॉफिट आफ्टर टॅक्स/PAT): ₹501 कोटी, मागील आर्थिक वर्षापेक्षा ₹488 कोटी अधिक,
- मागील आर्थिक वर्षासाठी (FY23) ही संख्या ₹12 कोटी होती.
स्पंदन स्फूर्ती फायनान्शियल लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. शलभ सक्सेना, यांनी परिणाम जाहीर करताना सांगितले की, “स्पंदनच्या मॅनेजमेंट टीमने 2022 साली विजन 2025 नामक एक तीन वर्षीय कार्यक्रम मांडला होता. आर्थिक वर्ष 2024 हे त्या कार्यक्रमाचे दुसरे वर्ष होते. आमचे विकास धोरण हे ग्राहक संपादन करणे यावर असते. त्यामुळे आर्थिक वर्ष 2024 मध्ये आमची AMU वाढ ही 41% झाली. याच आर्थिक वर्षात कंपनीने ₹501 कोटीचा आतापर्यंतचा सर्वोच्च PAT दिला. FY24 मध्ये म्हणजे याच आर्थिक वर्षात GNPA आणि NNPA अनुक्रमे 1.50% आणि 0.30% वाढला. आर्थिक वर्ष 24 मध्ये 13.9 लाख ग्राहक संपादन केल्यामुळे कंपनीची सक्रिय ग्राहक संख्या 33 लाख अधिक झाली आहे. शाखेचा विस्तार, पोर्टफोलिओच्या गुणवत्तेत सुधारणा, प्रक्रिया मजबूत करणे, प्रशासन आणि नवीन व्यवसाय लाइन सुरू करणे यासारख्या संस्थेच्या अनेक प्राधान्यक्रमांचे व्यवस्थापन करण्यासाठी टीमने दृढ क्षमता प्रदर्शित केली आहे. आम्ही आर्थिक वर्ष 2025 मध्ये गती टिकवून ठेऊ. त्यासोबतच आम्ही विशेषकरून वितरणाची कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आतापर्यंत झालेली प्रगती आणि सर्व भागधारकांच्या पाठिंब्यामुळे आम्ही स्वतःसाठी निश्चित केलेले टप्पे गाठू शकतो असा आम्हाला आत्मविश्वास आहे.”
आर्थिक वर्ष ‘24 च्या चवथ्या वित्तीय तिमाहीचे (Q4FY24) आणि आर्थिक वर्ष 2024 चे प्रमुख ठळक मुद्दे असे आहेत:
- AMU – ₹11,973 कोटी. तिमाही ते तिमाहीत (QoQ) 15% वाढ. आर्थिक वर्ष ‘24 च्या तिसऱ्या वित्तीय तिमाहीत (Q3FY24) ती ₹10,404 कोटी होती आणि वर्ष-दर-वर्ष (YoY) मध्ये त्यात 41% ची वाढ दिसून येते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ती ₹8,511 कोटी होती.
- वितरण आणि सदस्य संपादन: ग्राहक संपादनामुळे स्पंदनमध्ये वाढ होत आहे.
- FY24 मध्ये 13.9 लाख नवीन ग्राहक प्राप्त झाले. अशा प्रकारे त्यात 59% वाढ झाली. या तिमाहीत नवीन ग्राहकांची भर 4.4 लाख होती आणि 30% ची तिमाही-ते-तिमाही (QoQ) वाढ नोंदवली गेली.
- FY24 मध्ये ₹10,688 कोटींचे वितरण झाले जे FY23 मध्ये ₹8,125 होते. अशा प्रकारे त्यात 32% वाढ झाली.
- Q4FY24 मध्ये म्हणजे आर्थिक वर्ष 2024 च्या चवथ्या तिमाहीत ₹3,970 चे वितरण झाले. म्हणजे त्यात तिमाही-ते-तिमाही 56% वाढ आणि वर्ष-दर-वर्ष 30% वाढ झाली.
- मालमत्तेची गुणवत्ता: असेट बुकमध्ये निरंतर सुधारणा होत आहे.
- GNPA – 1.50% आहे. ते 31 डिसेंबर 2023 मध्ये 1.61% तर 31 मार्च 2023 मध्ये 2.07% होते.
- NNPA – 0.30% आहे. ते 31 डिसेंबर 2023 मध्ये 0.48% तर 31 मार्च 2023 मध्ये 0.64% होते.
- PCR (तरतूद कव्हरेज प्रमाण/प्रोविजन कव्हरेज रेशो) – 79.95% पर्यंत वाढले आहे. ते Q3FY24 मध्ये 70.45% होते.Ends (TGN)