सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडने ‘सतीश वाघ फाऊंडेशन’च्या माध्यमातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान टायगर सफारीला १४ आसनी वाहन दान करून वन्यजीव संरक्षणाला चालना दिली.

Supriya Lifescience Ltd.

मुंबई, 17 एप्रिल, 2024 (TGN) – सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड, एक्टिव फार्मास्युटिकल इंग्रीडिएंट्स (एपीआई) निर्माण करणारी जागतिक स्तरीय कंपनी. या कंपनीच्या ‘सतीश वाघ फाउंडेशन’ च्या माध्यमातून , कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) समर्पणाच्या अनुषंगाने, संजय गांधी नॅशनल पार्क मधील टाइगर सफारीसाठी १४ – आसनी फोर्स वातानुकूलित अर्बानिया वाहन उदारतेने दान केले. ज्याची किंमत लगबग ३५ लाख रुपये आहे.

या महत्त्वपूर्ण योगदानाचे उद्दिष्ट टायगर सफारीमध्ये पर्यटन अनुभव वाढवणे, तसेच संरक्षणाच्या प्रयत्नांना समर्थन देणे आणि शाश्वत पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देणे हे आहे. वाहन देणग्यांव्यतिरिक्त, सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड, सतीश वाघ फाऊंडेशनच्या माध्यमातून, प्राणी दत्तक घेणे आणि संवर्धन प्रकल्पांसाठी आर्थिक देणगी देण्यासह विविध वन्यजीव संरक्षण आणि विकास उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी असते.

सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सतीश वाघ यांनी सांगितले की, “आम्ही वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि विकास उपक्रमांसाठी सखोल वचनबद्ध आहोत. आमच्या अलीकडील १४ – आसनी एसी फोर्स अर्बानिया वाहनाच्या देणगीव्यतिरिक्त, आम्ही यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२ -२०२३ मध्ये तीन प्राणी ९.१० लाख रुपयांना दत्तक घेतले आहेत. तसेच उद्यानाच्या प्रवेशद्वारावर एक माहिती प्रदर्शन फलक बसवण्याचा प्रयत्नहि केला. वन्यजीव आणि संवर्धन पद्धतींबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आमचे समर्पण आहे. सुप्रिया लाइफसायन्स लि. मध्ये, आम्ही पर्यावरणीय कारभाराला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहोत. आपल्या नैसर्गिक वारशाचे पिढ्यानपिढ्या जतन सुनिश्चित करणे हा या मागचा हेतू आहे .”

गेल्या तीन वर्षांत, सतीश वाघ फाउंडेशनने CSR उपक्रमांतर्गत रु. ११.५० कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक सामाजिक उन्नती आणि वाढीच्या दिशेने केली आहे. या उपक्रमांमध्ये शिक्षण, क्रीडा प्रोत्साहन, शाळांमधील डिजिटायझेशनचे प्रयत्न आणि उच्च शिक्षणासाठी समर्थन अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. फाउंडेशनच्या संसाधनांच्या मदतीने सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड, वन्यजीव संरक्षण आणि समुदाय कल्याणावर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते, जे त्याच्या मूळ मूल्यांशी संरेखित आहे.

सतीश वाघ फाउंडेशनची स्थापना सुप्रिया लाइफसायन्सेस लिमिटेडच्या कॉर्पोरेट धोरण पद्धती आणि पर्यावरण संरक्षणाचा चिरस्थायी वारसा अधोरेखित करते. सतीश वाघ फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांद्वारे, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेमध्ये स्थिर राहण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *