ब्रिटानिया द लाफिंग काऊ चीज’च्या वतीने अशाप्रकारचे एकमेव कंटेंट हब, ‘Cheeseitup.in’ लॉन्च् केला
मुंबई, 24 ऑगस्ट, 2024 (TGN): चीज हा एक अष्टपैलू घटक असून तो आहारात आनंद आणतो आणि अगदी सोप्या पदार्थांची चव वाढवतो. हे सार स्वीकारत, ब्रिटानिया द लाफिंग काऊ चीजने सर्व वयोगटातील चीजप्रेमींसाठी एक अद्वितीय कंटेंट हब CheeseItUp.in सुरू केले आहे.
माईंडशेअर आणि टाइम्स नेटवर्कच्या भागीदारीत तयार करण्यात आलेल्या या डिजिटल हबचे उद्दिष्ट चीजप्रेमींसाठी एक समुदाय तयार करण्याचे आहे. हे विविध प्रकारचे चीज, पाककृती, डीआयवाय व्हीडिओ, ब्लॉग आणि इतर घटकांबद्दल विस्तृत माहिती प्रदान करते. CheeseItUp.in मध्ये ब्रिटानिया द लाफिंग काऊ चीजचे विविध प्रकारचे चीज समाविष्ट करून दररोजच्या जेवणाला चवदार बनविणारी सोपी आणि स्नॅक करण्यायोग्य सामग्री आहे. तुम्हाला झटपट खाऊच्या कल्पना पाहिजे असतील किंवा चवदार पाककृती शोधत असाल तर हा मंच मनोरंजक, वापरकर्त्यासाठी अनुकूल कंटेंट उपलब्ध करून देतो. ज्यामुळे पाककृती सोप्या पद्धतीने करता येतात याची खात्री होते. वापरकर्ते स्वत:च्या पसंतीनुसार तयार केलेल्या पाककृती सहजपणेसेव्ह आणि डाउनलोड करू शकतात.
सन 2022 मध्ये, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि फ्रेंच चीज उत्पादक बेल फूड्सने संयुक्त उपक्रमात प्रवेश करत ब्रिटानिया बेल फूड्सची स्थापना केली. ब्रिटानिया द लाफिंग काऊ चीज म्हणून सह-ब्रँडेड चीज पोर्टफोलिओ सुरू केला. CheeseItUp.in प्लॅटफॉर्म चीजला प्रत्येक स्वयंपाकघरात एक प्रिय आणि अष्टपैलू घटक बनविण्याच्या दिशेने एक पुढचे पाऊल ठरेल.
ब्रिटानिया बेल फूड्स आणि सीबीओ ब्रिटानिया डेअरीचे सीईओ अभिषेक सिन्हा म्हणाले, “CheeseItUp.in हा ब्रिटानिया द लाफिंग काऊ चीजचा सर्व चीजप्रेमी आणि नवशिक्यांसाठी प्रयत्न आहे. ज्यांना सतत उत्पादन श्रेणीबद्दल ज्ञान गोळा करण्याची इच्छा आहे. ब्रिटानिया आणि बेल समूह यांच्यातील संयुक्त उपक्रमानंतर, आम्ही फ्रेंच समूहाकडून घेतलेले शिक्षण तसेच कौशल्याने श्रेणीतील फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रवास सुरू केला. भारतातील एक नवजात श्रेणी म्हणून, चीज, त्याचे फायदे आणि वापर याबद्दलची जागरूकता अजूनही मर्यादित आणि खंडित आहे हे आम्ही जाणून आहोत. सर्व भारतीयांसाठी ही दरी भरून काढणारा सर्वसमावेशक मंच तयार करण्यासाठी आम्ही टाइम्स नेटवर्क आणि माइंडशेअर या आमच्या भागीदारांसोबत हे आव्हान स्वीकारतो.
या भागीदारीवर भाष्य करताना, रोहित गोपकुमार, सीईओ- झेडईएनएल आणि बीसीसीएल (टीव्ही विभाग) म्हणाले, “आमचे प्रेक्षक आणि ग्राहक दोघांनाही संतुलित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. लक्ष्यित सामग्रीच्या प्रस्तावाद्वारे ब्रँड उद्दिष्टे साध्य करण्याचे समाधान आमच्या कार्यसंघाला उत्तेजित करते. ब्रिटानियाने आपल्या विविध उत्पादनांसाठी अत्याधुनिक संप्रेषण कल्पना तयार करण्यात सातत्याने आघाडी घेतली आहे. ब्रिटानिया द लाफिंग काऊ चीज आणि टाइम्स नेटवर्क डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्यातील ही भागीदारी निःसंशयपणे चीज श्रेणीत नवीन पाय रोवेल. ब्रँड विचारांच्या नेतृत्वासह सामग्रीशी जुळणारी नवीन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी ब्रिटानिया आणि माइंडशेअरची भागीदारी हा प्रेक्षकांच्या सखोल गुंतवणुकीचा मार्ग आहे. आता CHEESEITUPची वेळ आली आहे! ”
या भागीदारीबद्दल बोलताना टाइम्स नेटवर्क, डिजिटलचे अध्यक्ष आणि सीओओ रोहित चड्डा म्हणाले, “कंटेंट-आधारित वाणिज्य धोरणात्मकदृष्ट्या ग्राहकांना सर्वोच्च दर्जाचा अनुभव देण्यासाठी खरेदी प्रक्रियेत सामग्री समाकलित करते. टाइम्स नेटवर्क डिजिटलकडे बातम्या आणि जीवनशैलीच्या श्रेणींमध्ये देशातील प्रीमियम, प्रभावशाली प्रेक्षकांचा सर्वात मोठा आधार आहे. आमचा ब्रँड TimesFoodie.com, अन्न सामग्रीमधील उद्योगातील अग्रगण्य प्लॅटफॉर्म, ब्रिटानियासाठी असे फूड डेस्टीनेशन तयार करण्यासाठी परिपूर्ण भागीदार आहे. ‘CheeseItUp.in’ ची कल्पना म्हणजे उत्पादनाचे ज्ञान आणि वापर निर्माण करणे, तसेच ई-कॉमर्ससाठी एक नाविन्यपूर्ण दृष्टीकोन स्वीकारत थेट ब्रँडसाठी महसुलाला चालना देते.
माईंडशेअरचे सीईओ अमीन लाखानी म्हणाले, “CheeseItUp.in हे केवळ एक व्यासपीठ नसून हे आपले मजेदार आणि चवदार पाककला मैदान आहे! आपल्याला चीज हा दैनंदिन आहार नियोजनाचा एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी भाग बनवायचा आहे. ब्रिटानिया द लाफिंग काऊ चीजसह निरोगी आणि प्रेरणादायी पाककृती तयार करण्यासाठी आम्ही ग्राहकांची वास्तविक माहिती वापरतो. हा कंटेंटद्वारे समर्थित व्यापार आहे. माइंडशेअरने ब्रिटानिया बेल फूड्स आणि टाइम्स न्यूज नेटवर्क यांच्यात भागीदारी केली आहे. चीज-आधारित निर्मितीच्या संपूर्ण नवीन जगाचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा! हा मंच लोकांच्या दैनंदिन जीवनात ब्रिटानिया द लाफिंग काऊ चीजचा आनंद घेण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणेल हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत “.
याव्यतिरिक्त, ‘Cheeseitup.in’ सह क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण ग्राहकांना काही क्लिकमध्ये चीज खरेदी करण्याचा पर्याय देते, ‘Cheeseitup.in’ ब्रिटानिया लाफिंग काऊ चीजचा आनंद घेण्यासाठी विना-त्रास अखंडपणे कार्यरत आहे.
==========================================================================================================================================================