ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाऊंडेशनच्या सहकार्याने गाठला महत्त्वाचा टप्पा; वेदनामुक्त महाराष्ट्रासाठी अध्यक्षांकडून 70 कोटी रुपयांचे आश्वासन
मुंबई, 5 डिसेंबर 2025 ( TGN ): अजिंठा फार्माचे उपाध्यक्ष आणि सह-संस्थापक आणि युगांडा प्रजासत्ताकाचे माननीय वाणिज्यदूत, सामाजिक कार्यकर्ते श्री. मधुसूदन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनने एक महत्त्वाचा सन्मान पटकावला. त्यांच्या पेन-फ्री महाराष्ट्र उपक्रमाचा भाग म्हणून 24 तासात सर्वाधिक गुडघे तपासणी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा सन्मान पटकावला आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या जपानमधून आलेल्या परीक्षक सुश्री सोनिया उशिरोगोची यांनी आज मुंबईत या विक्रमाला अधिकृतरित्या प्रमाणित केले. महाराष्ट्रातील वंचित समुदायातील 512 रुग्णांची वैद्यकीय पथकांनी अखंडितरित्या तपासणी करत होते. वाशिम जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सर्वात अडचणीत असलेल्या रिसोड येथे 27-28 नोव्हेंबर 2025 दरम्यान या तपासणीचे आयोजन करण्यात आलेले होते.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे आठवडाभर सुरू असलेल्या मोफत सांधे आरोग्य तपासणी शिबिराच्या पार्श्वभूमीवर हा विक्रम रचण्यात आला आहे. वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ यासह 10 हून अधिक जिल्ह्यांतील रुग्णांना मांडी आणि गुडघ्याची मोफत तपासणी करता आली. हालचाल आणि चालण्याचे मूल्यांकन करत या शिबिरात गुडघा किंवा मांडीचे हाड बदलण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर प्राधान्याने लक्ष देण्यात आले. वैद्यकीय समुपदेशनासोबतच, पुढील तपासणीचे नियोजन आणि सर्व उपस्थितांना यावेळी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, शस्त्रक्रियेची शिफारस केलेल्या प्रत्येक रुग्णाला फाउंडेशनकडून शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधी दिला जाईल. या उपक्रमामुळे आरोग्यसेवा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी वेळेवर निदान तर होईलच पण लोकांमध्ये जागरूकता देखील वाढीस लागेल.
या उपक्रमाबद्दल श्री. मधुसूदन अग्रवाल म्हणाले: “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवणे हा निश्चितच सन्मान आहे. पण, ज्या लोकांपर्यंत सांध्यांच्या काळजीची गरज आणि उपचार याची माहिती पोहोचत नाही, अशा लोकांपर्यंत पोहोचणे हे खरे यश आहे. आज, वयाच्या 70 व्या वर्षी मी समाजाला काहीतरी योग्य ती परतफेड करणे, ही माझी जबाबदारी मानतो. आणि त्यातूनच हा उपक्रम प्रत्येक नागरिकासाठी राबवला जात आहे, मग त्यांची आर्थिक पार्श्वभूमी काहीही असो. निरोगी, मानाने आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम आमची वचनबद्धता दर्शवितो. हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या आमच्या डॉक्टर, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.”
पेन फ्री महाराष्ट्र मोहिमेची सुरुवात करताना ते म्हणाले, “वंचित समुदायांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधले जाणे, हे या यशाचे खरे महत्त्व आहे. पेन फ्री महाराष्ट्रासह, जागरूकता निर्माण करणे, वेळेवर काळजी घेण्यास प्रोत्साहन देणे तसेच लोकांना त्यांची हालचाल आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी पाठिंबा देणे हे आमचे ध्येय आहे. ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही हे यश गाठू शकलो, अशा आमच्या डॉक्टर, स्वयंसेवक आणि भागीदारांचे मी मनापासून आभार मानतो.”
आपल्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री. मधुसूदन अग्रवाल यांनी ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्यसेवेची उपलब्धता वाढविण्यासाठी 70 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. या निधीतून वंचित समुदायांसाठी सांध्यांची काळजी घेण्यासाठी सुविधा, वेळेवर निदान होण्याची सोय आणि हालचालीशी संबंधित गोष्टींना प्राधान्य दिले जाईल. सांध्याच्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या हजारो लोकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हा उपक्रम सामाजिक आरोग्यसेवा विकासासाठी त्यांच्या दीर्घकालीन समर्पणाला अधोरेखित करते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या जपानमधील परीक्षक श्रीमती सोनिया उशिरोगोची म्हणाल्या, “या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वतीने ममता मधुसूदन अग्रवाल मेमोरियल फाउंडेशन आणि संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अभिनंदन करू इच्छिते. प्रतिबंधात्मक काळजी, जागरूकता वाढवणे किंवा सामाजिक आरोग्याला प्रोत्साहन अशा आरोग्यविषयक उपक्रमांना पाठिंबा देणे आणि त्यांचा सन्मान करून त्यांना ओळख मिळवून देणे हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सला नेहमीच अभिमानास्पद वाटते. मानवतेचा दृष्टिकोन, सामाजिक भान जपत जगाला एक चांगले, निरोगी ठिकाण बनवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उपक्रमाला हे प्रमाणपत्र देण्याची संधी मिळणे, हा जणू माझाच सन्मान आहे.”
ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनने महाराष्ट्रात 214 मोफत वैद्यकीय शिबिरांद्वारे सामाजिक आरोग्यसेवेला भक्कम पाठबळ दिले आहे. या अंतर्गत ते 39,000+ लोकांपर्यंत पोहोचले असून त्यांना आवश्यक ती मदत करण्यासोबतच आयुष्य बदलण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांच्या व्यापक वैद्यकीय उपक्रमांमध्ये 300+ लोकांना सांधे बदलण्यासाठी अनुदान, 150+ कर्करोग शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी, 1,500+ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 150+ कृत्रिम अवयव, 50 ईएनटी शस्त्रक्रिया, 6,500+ डायलिसिस सत्रे आणि बालरुग्णांसाठी 50 ऑर्थोपेडिक सुधारणांचा समावेश आहे. ज्यांना सर्वाधिक गरज आहे अशांना न्याय्य, परवडणारी आणि उत्तम आरोग्यसेवा प्रदान करणे, तसेच वंचित समुदायांसाठी ज्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्या उपलब्ध करून देणे, हे फाउंडेशनचे ध्येय असून ते या महत्त्वाच्या उपक्रमांमधून प्रतिबिंबित होते.
214 मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करत आणि 39,000 लोकांपर्यंत पोहोचत या फाउंडेशनने मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा पुरवली आहे. त्यांच्या उपक्रमांमध्ये सांधे बदलण्यासाठी अनुदान, कर्करोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू उपचार, कृत्रिम अवयव आणि डायलिसिससाठी मदत यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत समुदायांसाठी या सेवा अत्यंत सोयीच्या आणि उपयुक्त आहेत. सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठीची फाउंडेशनची शाश्वत वचनबद्धता यातून समोर येते.
श्री. मधूसुदन अग्रवाल यांच्याबद्दल
श्री. मधुसूदन अग्रवाल हे युगांडाचे मुंबईतील माननीय वाणिज्य दूत, अजंता फार्मा लिमिटेडचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष, तसेच ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनचे संस्थापक-विश्वस्त आहेत. विदर्भातील रिसोड येथे जन्मलेल्या अग्रवाल यांनी 10 हजार रुपयांच्या पाठबळावर 1973 मध्ये अजंता फार्मा ही कंपनी उभारली आणि तिला जागतिक पातळीवर नेले. आज ही कंपनी 30+ देशांमध्ये कार्यरत आहे. यात अनेक यूएस एफडीए-मंजूर प्लांट आणि 8,000 हून अधिक कर्मचारी आहेत.
व्यवसाय करताना देखील मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या अग्रवाल यांनी मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा, समाजकार्य आणि ग्रामीण जीवनमान सुधारण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांचे नेतृत्व केले आहे. यात मोफत वैद्यकीय शिबिरे, अनुदानित शस्त्रक्रिया, मोबाइल आरोग्य सेवा, आंतरराष्ट्रीय बालरोग हृदय शस्त्रक्रिया आणि मुंबईतील संजीवनी ममता रुग्णालय यांचा समावेश आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात युगांडाचा डायमंड ज्युबिली मेडल (युगांडाचा सर्वोच्च नागरी सन्मान), लोकमत कोहिनूर ऑफ इंडिया, कॉन्स्युलर ऑफ द इयर, एबीएल बिझनेस इनोव्हेटर पुरस्कार आणि सामाजिक सेवेसाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे.
व्यवसाय आणि सामाजिक कार्याच्या पलीकडे जाऊन, ते रिअल इस्टेट आणि औद्योगिक विकासातही योगदान देतात. या क्षेत्रातील इन्स्पिरा ग्रुपचे नेतृत्व ते करतात, सांस्कृतिक संवर्धनासाठी प्रयत्नशील असतानाच ते विपश्यनेचे दीर्घकाळ अभ्यासक आहेत. “आपण जे कमावतो ते समाजाला परत केले पाहिजे” या विचाराने चालणारे श्री. अग्रवाल हे उद्देशपूर्ण उद्योजकता आणि दयाळू नेतृत्वाद्वारे अनेकांची आयुष्ये आमुलाग्र बदलून टाकतात.

